Tuesday, October 10, 2017

ऑनलाईन खरेदी करताय.? वाचा ह्या टिप्स..



नेमकाच दसरा झालाय दिवाळी जवळ येऊन ठेपलिये, वेग-वेगळ्या दुकानांत दिवाळी चे प्रचंड मोठ मोठे सेल लागलेले आहेत.त्यात फ्लिपकार्ट, ऍमेझॉन या सारख्या इतरही इ-कॉमर्स साईट वरती त्यांचे त्यांचे सेल सुरु झालेत. त्यात प्रचंड मोठ मोठाले डिस्काउंट बघून कोणीच स्वतःला शॉपिंग करण्या पासून रोखू शकले नाही. अन ह्या ऑनलाईन डील्स आपल्याला अक्षरशः वेड लावतील कि काय अशी परिस्थिती. तर स्वतःच्या उत्सुकते वर थोडी शी आवर घालून ऑनलाईन शॉपिंग करतांना काही लहान लहान गोष्टींकडे जर आपण लक्ष दिले तर आपला हा शॉपिंग चा अनुभव थोडा सुखकर, सुलभ आणि बराच सुरक्षितही होईल.

1)वेबसाईट ची निवड-
ऑनलाईन खरेदी करताना सर्वात आधी अन सर्वात महत्वाची काळजी घ्या ती आपण कोणत्या ऑनलाईन वेबसाइट वरून खरेदी करत आहोत. ह्या वेबसाईट च्या गर्दीत जुनी, ओळखीची अन भरावश्याची वेबसाईट निवडलेली कधीही चांगलीच. एखाद्या अनोळखी किंवा नवीन वेबसाईटहुन कोणत्याही प्रकारची खरेदी करायच्या आधी त्या वेबसाईट बद्दल शक्य तेवढी तपासणी करून घ्या. या कामी गुगल वर आपण त्या वेबसाईटचे रिव्ह्यू तपासून पाहू शकतो. 

2)वेबसाईटच्या विविध पॉलिसिज ची माहिती-
कोणत्याही वेबसाइट वरून काहीही ऑर्डर करायच्या आधी त्या वेबसाईटच्या रिटर्न पॉलिसी, रिफंड पॉलिसी, शिपिंग पॉलिसी विषयी सविस्तर माहिती घ्या. वेबसाईट तुम्हाला पर्चेस प्रोटेकशन देते का. जर तुम्ही ऑर्डर केलेलं प्रॉडक्ट तुम्हाला आवडले नाही तर ते परत करण्याची सुविधा उपलब्ध आहे का.? जर परत करण्याची सुविधा उपलब्ध असेल तर परत पाठवण्यासाठी येणारा कुरिअर चा खर्च वेबसाईट देणार की तो खर्च आपल्याला करावा लागेल. अश्या प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घ्या. काही अडचणी अथवा शंका असतील तर वेबसाईट च्या कस्टमर केअर ला फोन करून आपल्या शंका दूर करून घ्या.

3)प्रॉडक्ट ची उलट-तपासणी-
कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करायच्या आधी त्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्या प्रॉडक्ट बद्दल एक्स्पर्ट रिव्ह्यू पहा, वाचा. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व घटक, सुविधा तुम्ही निवडत असलेल्या प्रॉडक्ट मध्ये असल्या बाबत खात्री करून घ्या. वेबसाईट वर विक्रेत्या नी प्रॉडक्ट ची दिलेली माहिती संपूर्ण वाचा. तिथले कस्टमर रिव्ह्यू वाचा. अन या कस्टमर रिव्ह्यू व्यतिरिक्त गुगल वर इतरत्र असलेले कस्टमर रिव्ह्यू सुद्धा वाचा.

4)प्राईस कंपेअर करा-
कोणतेही प्रॉडक्ट ऑनलाईन खरेदी करायच्या आधी वेग वेगळ्या इ-कॉमर्स वेबसाईटवर त्यांच्या किमती कंपेअर करून ते प्रॉडक्ट कोणत्या ठिकाणी स्वस्त मिळेल ते बघू शकतो. या कामी 91mobiles.com, mysmartprice, compareraja अश्या विविध वेबसाईटची मदत घेऊ शकतो. या वेबसाईटचे अँड्रॉइड ऍप सुद्धा उपलब्ध आहेत.प्राईस कंपॅरीजन वेबसाईट आपल्याला आपले पैसे वाचवायला नक्कीच मदत करतील.

5)सेलर रेटींग चेक करा-
बऱ्याच मोठ्या आणि विश्वासार्ह वेबसाईटवर वेग वेगळे सेलर स्वतःच्या प्रॉडक्टची विक्री करू शकतात. मग एकचं प्रॉडक्ट एकाच वेबसाईटवर वेग वेगळ्या सेलर कडून कमी-जास्त किमतीला उपलब्ध असलेलं दिसतं.  अश्या वेळी गोंधळून न जाता सेलर चे रेटींग चेक करायला हवं. उत्तम सेलर रेटींग असलेला सेलर निवडणे नेहमीच योग्य.

6) पेमेंट ची पद्धत-
सर्व झालं, अन आपण शेवटी चेकआउट करायला लागलो की येतो सर्वात मोठा प्रश्न. पेमेंट कसे करावे.? वेबसाईट आपल्याला वेग वेगळे ऑपशन देते नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेट्स आणी आपलं सर्वात आवडतं आणी सोयीचं असलेलं कॅश ऑन डिलिव्हरी.
आता पेमेंट ची पद्धत निवडतांना शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी ला प्रथम प्राधान्य द्या. कारण यात प्रॉडक्ट तुमच्या हातात येई पर्यंत पैसे तुमच्या हातून गेलेले नसतात. या नंतर मोबाईल वॉलेट्स ला आपण दुसरी पसंती देऊयात, याच कारण असं की मोबाईल वॉलेट्स आपल्याला वेग वेगळे कॅशबॅक आणी डिस्काउंट तर देतातच पण जर पेमेंट फेल झालं किंवा रिफंड घ्यायचं काम पडलं तर खूप सहज आपण मोबाईल वॉलेट्सवर परत मिळवू शकतो. त्यानंतर क्रेडिट कार्ड ला प्राधान्य देऊयात, कारण डेबिट कार्ड च्या तुलनेत क्रेडीट कार्ड अधीक सुरक्षा पर्यायांनी रक्षीत केलेले असतात. अन सर्वात शेवटी नेट बँकिंग, कारण नेट बँकिंग वापरण्याचे कॅशबॅक किंवा रिफंड असे फायदे फारच क्वचित असतात, आणी पेमेंट करायचा हा मार्ग काही जास्त सुरक्षीत नाहीये.